# KANAGEE — स्टॉल नोंदणी

आपली खाद्यसंस्कृती, आपली परंपरा आणि आपली ओळख… जपण्याची जबाबदारी आपलीच!

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी खाद्यपरंपरा, वेगळी चव आणि वेगळी ओळख आहे. याच अस्सल चवींना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी आम्ही ‘३६ जिल्हे – ३६ खाद्यपदार्थ’ या भव्य खाद्यप्रदर्शनाचे आयोजन करत आहोत.

पुण्यात वास्तव्यास असलेल्या, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या आणि आपल्या जिल्ह्याचे पारंपरिक खाद्यपदार्थ बनवण्याचे कौशल्य असलेल्या महिलांसाठी ही विशेष संधी आहे. केटरिंगचा अनुभव असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात जेवण बनवू शकणाऱ्या पुरुषांचेही स्वागत आहे.

## स्टॉलधारकांसाठी नियम व अटी

1. **पनीर पदार्थांना मनाई** — कोणत्याही स्टॉलवर पनीरचा वापर करून तयार केलेले पदार्थ विक्रीस ठेवण्यास परवानगी नाही.

2. **पदार्थांची मर्यादा** — प्रत्येक स्टॉलवर जास्तीत जास्त एक व्हेज आणि एक नॉनव्हेज पदार्थ विक्रीस ठेवण्याची परवानगी असेल.

3. **स्टॉल भाडे नाही** — स्टॉलसाठी भाडे आकारले जाणार नाही. टेबल, वीज आणि हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांचे शुल्क लागू असेल. या शुल्काची माहिती लवकरच कळवली जाईल.

4. **गर्दी व्यवस्थापन** — मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने गर्दी हाताळण्याचा पूर्वानुभव, पुरेसे मनुष्यबळ आणि जलद सेवा देण्याची तयारी असणे अनिवार्य आहे.

5. **स्वच्छता व अन्नाची गुणवत्ता** — स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे. सर्व खाद्यपदार्थ उत्तम दर्जाचे, ताजे, स्वच्छ आणि अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक चवीचे असावेत.

वरील सर्व नियम व अटींचे पालन प्रत्येक स्टॉलधारकासाठी अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजकांना संबंधित स्टॉलवर योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार राहील.

## Apply

Complete the existing Google Form at https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScVOrULmdyG7SB_fciQXsb24QA1d-VtOV7nWtJbRyZFTpPJ3Q/viewform. It is also embedded at https://kanagee.com/register/. Follow the questions and consent instructions in the Google Form. Service charges will be announced. Submission does not confirm a stall. Toll-free: 1800 210 3696.
